पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
राहुल शेवाळे प्रकरणी फेसबुक लाईव्हद्वारे
पीडितेची ओळख उघड केल्यानं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे अडचणीत आल्या
आहेत.
पीडितेचे नाव घेणं
किंवा तिला कॅमेऱ्यासमोर आणून पीडितेची ओळख लोकांसमोर आणणं चुकीचं आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी काल राहुल शेवाळे प्रकरणातील
पीडितेचं फेसबुक लाईव्ह केलं, त्यानंतर अनेक सामाजिक संघटनाकडून तक्रारी आल्या. त्यामुळं
महिला आयोग विधी विभागाचा अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करणार आहे. राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली.
“माझ्या लाईव्हमध्ये
पीडित महिला स्वतः लाईव्ह आली आहे आणि तिने स्वतः चेहरा दाखवला आहे. तिला न्याय
मिळत नसल्यानं लाईव्ह यावं लागलं. राज्य महिला आयोग किंवा राष्ट्रीय महिला
आयोगाकडून याप्रकरणी पोलिसांना पत्र गेली आहेत मग पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी
गुन्हा का दाखल केला नाही. पीडित महिलेची फिर्याद तुम्ही का दाखवत नाहीत? तिच्यावर शारजाहमध्ये
खोटी केस दाखल केली आहे,” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या,”माझ्या
लाईव्हवर जर कोणाला तक्रार असेल तर ती केवळ त्याच पीडित महिलेला असू शकते. बाकी
माझ्या विरोधात कोणी तक्रार करत असेल तर ते 'शिंदे' गटाचे असतील. पीडित
महिला स्वतः जर न्याय मागण्यासाठी येत असेल तर गुन्हा दाखल होत नाही. उद्या मी
विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या सर्व
प्रकरणांसंदर्भात नागपूरमध्ये जाऊन कागदपत्रं सादर करणार आहे. गरज पडल्यास पीडितेस
घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाईल.”
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84