पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): इमारतीच्या
बांधकामावेळी मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केली नसल्यामुळे
पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर दुसरा
कामगार जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, बाणेर-पाषाण लिंक
रोडवरील माउंट क्लेअर इमारत येथे 12 डिसेंबरला दुपारी घडली. रोहन रामचंद्र घाडे (सुखसागर नगर) असे मृत्यू झालेल्या
मजुराचे नाव आहे. आशिष बिंद हे यात जखमी झाले. बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील माउंट
क्लेअर इमारत परिसरात बांधकाम सुरू आहे. रोहन आणि आशिष तळमजल्यावरील टाकीच्या
भिंतीचे काम करीत होते. त्या वेळी भिंत कोसळली. रोहन गंभीर जखमी झाला.
उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आशिषवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहनच्या
अंत्यविधीनंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.
याप्रकरणी रोशन घाडे
(वय 20) यांनी
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रवींद्र चणबस डंडे (वय 39,
रा. साई संकुलन, थेरगाव) आणि गोविंद राम
सोनटक्के या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव
तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84