पुणे, दि. 21 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): जगातील
आर्थिकदृष्ट्या प्रगत 20 देशांची 'जी 20 परिषद' 2023 मध्ये पुण्यात होणार आहे. पुण्यातही
जानेवारी आणि जूनमध्ये या परिषदेच्या तीन बैठका होणार आहेत. या बैठकीसाठी विविध
100 हून अधिक प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत.
या जी 20 परिषदेसाठी
महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सुशोभीकरणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.
पुण्यातील 60 चौक आणि चौकात बेटे यांचे सुशोभीकरण केले जात आहे. परिषदेच्या
बैठकीसाठी येणारे प्रतिनिधी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर काही
भागांतून प्रवास करणार आहेत.
यासाठी विमानतळ ते
सेनापती बापट रस्ता, शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांवर शोभेची कृत्रिम झाडे उभी करण्यात येतील
असा निर्णय झाला आहे. ही झाडे आठ दिवसांसाठी भाडेत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे
विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. एका झाडावर 180 वॅटचे
बल्ब असून, एका झाडासाठी 15 ते 20 हजार रुपये भाडे जाणार
असल्याचे कंदुल यांनी सांगितले.
यासोबतच पथदिवे
एकसारखे असावेत ते नादुरूस्त किंवा बंद असू नयेत, यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाकडून
उपाययोजना केल्या जात आहेत. पथदिव्यांंच्या खांबांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84