Type Here to Get Search Results !

वारजे, धायरी मध्ये घरफोडीच्या घटना; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): शहरात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. सिंहगड रोड, लोणीकंद आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे घरफोडीचे प्रकार घडले. त्यामध्ये तब्बल 4 लाख 33 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

 

वारजे येथे चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 60 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत मोहनराव सुतार (वय 39) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

दुसरी घटना धायरीत घडली आहे. चोरट्यांनी धायरीतील एक बंद फ्लॅट फोडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात विजय लायगुडे (वय 49) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा धायरीतील अमर मित्रमंडळ चौकातील गुरूकृपा नावाचा बंगला आहे. ते 24 डिसेंबर रोजी कुटुंबासह कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला व घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 3 लाख 33 हजारांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार सोमवारी (दि. 26 डिसेंबर 2022) परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.

 

तसेच, सांडस गावातील इंग्लिश स्कूल येथे घुसून चोरट्यांनी टॉयलेटमधील 15 नळ तसेच दुसर्‍या एका शाळेत घुसून टॉयलेटमधील 12 नळ चोरले आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.