Type Here to Get Search Results !

मित्राकडून उसने घेतलेले १ कोटी ८८ लाख परत न देणाऱ्या व्यावसायिकास अटक

 

पुणे, दि. 21 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): संकटात वेळोवेळी ज्याच्याकडून ७ कोटी रुपये उसने पैसे घेतले, त्यातील थकलेले १ कोटी ८८ लाख परत न करता, त्या मदत करणाऱ्या मित्रालाच खोटी तक्रार करून अडचणीत आणणाऱ्या व्यावसायिकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर न्यायालयाने या व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

 

अमित अरुण बजाज ( रा. क्लाऊड ९, कोंढवा ) असे या अटक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या आणि बजाज कुटुंबातील एकूण ५ सदस्यांच्या  विरोधात राजेश नंदलाल पेसवानी  ( रा. कोरेगाव पार्क ) यांनी तक्रार दिली आहे. अमित अरुण बजाज आणि राजेश नंदलाल पेसवानी हे १२ वर्षांपासून मित्र असल्यामुळे बजाज यांनी  व्यावसायिक अडचणीचे कारण सांगून  वेळोवेळी उसने पैसे मागून एकूण ७ कोटी रुपये पेसवानी यांच्याकडून आरटीजीएस द्वारे घेतले. ते परत देण्यासाठी वेळ लागत असल्याने दुकान, गोडावून पेसवानी यांना  विकण्याबाबत करारनामा केला. मात्र, ते नावावर करून दिले नाही आणि ताबाही दिला नाही.

 

उसने घेतलेल्या ७ कोटी रकमेतील पाच कोटी परत केले. थकलेले १ कोटी ८८ लाख परत करण्याचे टाळले. त्यासाठी पाठपुरावा केला असता बजाज याने पेसवानी यांच्याच विरोधात खंडणी मागत असल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अडचणीत आणले. मात्र, उसने दिलेल्यातील थकलेली १ कोटी ८८ लाख रूपये रक्कम नोव्हेंबर २०२२ पर्यंत न मिळाल्याने पेसवानी यांनी शिवाजीनगर पोलिसांमध्ये बजाज याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार १३ डिसेंबर २०२२ रोजी दाखल केली.

 

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ नुसार बजाजला अटक करून शिवाजीनगर न्यायालयात उभे केले असता त्याला सुरुवातीला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करीत आहेत. न्यायालयात पेसवानी यांच्या बाजूने अॅड. अनुप कुमार यांनी बाजू मांडली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.