पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): बुधवारी रात्री पुणे-सोलापूर रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनीतील लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने हडपसर परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात वेश्याव्यवसाय तसेच मटका, जुगार अड्ड्याप्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून 3 मुलींची सुटका करण्यात आली. एक मुलगी महाराष्ट्रातील आहे, तर अन्य दोन परराज्यांतील आहेत. त्यांना रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. तसेच, एक जण फरार झाला आहे. सुजित आदित्य सिंह (वय 26) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, शेट्टी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हडपसर पोलिसांत पोलीस हवलदार अजय राणे यांनी फिर्याद दिली. वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अण्णा माने, प्रमोद मोहिते व पथकाने या माहितीची खातरजमा करून येथे छापेमारी केली.
त्यापूर्वी (दि. 19 डिसेंबर २०२२) येथील परिसरात मटका, जुगार अड्ड्यावरही सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत 13 जणांना पकडण्यात आले. तर, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा 40 हजार 40 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वर उल्लेखलेल्या घटनांबरोबरच शहरात लूटमारीचाही प्रकार वाढलेला दिसत आहे. त्यातही हडपसर भागात या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पादचारी, तसेच वाहनचालकांना दुचाकीस्वार टोळक्याकडून धमकावत लुटले जात आहे. तर, महिलांचे मोबाईल व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले जात आहेत. सर्वाधिक गुन्हे असणार्या यादीत हडपसरचा प्रथम क्रमांक लागतो. 'स्ट्रीट क्राईम'चा उल्लेख गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84