पुणे, दि. 15 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर
आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी
तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत सनी किरण लांडे (वय ३२, रा. जयभवानीनगर, पौड
रस्ता) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरून ध्वनिचित्रफीत तयार करून प्रसारित करण्यात
आल्याचे लांडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
फेसबुकवर सचिन १४१४ नावाच्या
खातेधारकासह तिघांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
ध्वनिचित्रफितीत दोघे जण आक्षेपार्ह
भाषेत पाटील यांच्याविषयी वक्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. ज्या खात्यावरून
ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. त्या खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
पाटील यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर
तसेच शिवीगाळ करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात
दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बढे तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84