पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): कोरेगाव
खुर्द (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सीमा राजू झांबरे यांची
मोठ्या मताधिक्याने निवड करण्यात आली आहे. त्यानीं प्रतिस्पर्धी उमेदवार आरती
सुरेश काळे यांच्यावर तब्बल २८८ मताने मात केली.
पालकमंत्री तथा
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गावात येऊन उमेदवार
विजयी करण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील त्यांच्या समर्थक उमेदवाराचा पराभव
झाल्याने भाजपवर मोठी नामुष्की आली आहे.
मंत्री चंद्रकांत
पाटील यांच्यासह माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी उमेदवार
विजयी करण्याचे आवाहन केले होते. राज्याच्या मंत्र्याने ग्रामपंचायत पातळीवर येऊन
प्रचार केल्याने येथील विरोधी गटाने नाराजी व्यक्त केली होती. सुरुवातीला चुरशीची
वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली.
येथील सरपंचपद
सर्वसाधारण महिलांना राखीव होते.गावातील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच होण्यासाठी
काळे आरती सुरेश आणि झांबरे सीमा राजू यांच्यात सरळ सामना होता.यात काळे यांना ४३२
मते तर झांबरे यांना ७११ मते पडली.
वॉर्डनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -
*वॉर्ड क्रमांक एक ( तीन जागा
) -
१) जाधव मिनल विनायक ( १५४ मते ).
थोरात रंजना चिंधु ( ३८९ मते,विजयी ).
विद्या सतीश कडूसकर (३५५ मते,विजयी )
२) मेंगळे हॊना रामा ( बिनविरोध )
* वॉर्ड क्रमांक दोन ( तीन
जागा ) -
१) गावडे कैलास तुकाराम ( १२१ मते ).
मेंगळे रामदास रघुनाथ ( १७४ मते,विजयी ).
२) गावडे सहिंद्रा राजाराम ( १९३ मते,विजयी )
मेंगळे सीताबाई ज्ञानेश्वर ( १०१ मते
).
३) गाळव काळूराम नाना ( २३० मते, विजयी )
जाधव विनायक धर्माजी ( ६३ मते )
*
वॉर्ड क्रमांक तीन (तीन जागा) -
१) कडूसकर जया साहेबराव ( २३२ मते,विजयी ).
कडूसकर पूनम विकास ( १४८ मते ).
२) कडूसकर प्रविण विलास ( ८८ मते ).
घनवट माधुरी सुनिल ( १२२ मते ).
दोंद प्रकाश दत्तात्रय ( १७० मते, विजयी).
३) मेंगळे जिजा भिवा ( बिनविरोध ).
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
पंचायत विस्तार अधिकारी एस.एस.साळुंखे यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक म्हणून
तलाठी बंडेश आवटे यांनी मदत केली. पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक
लढविलेले आणि त्यात पराभूत झालेले रामदास मेंगळे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विजय
मिळविला.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गावडे,चेअरमन सुनील घनवट, मधुकर शेळके, किसन गोगावले, गणपत
गोगावले, भाऊसाहेब जाचक, दत्तात्रेय
घनवट, भाऊसाहेब शेळके, दिनकर गाळव, महादेव गाळव, हिरामण गावडे, सोपान
मेंगळे, रंगनाथ मेंगळे, वसंत मेंगळे, होना
मेंगळे, तुकाराम मेंगळे, बबन म्हसे,
बबनराव गावडे यांनी मदत केली.
उपसरपंच राजू झांबरे म्हणाले,”भाजपने या निवडणुकीत पालकमंत्री यांना बोलावून
खालचे राजकारण केले आहे. ही निवडणूक गावपातळीवर होऊ द्यायला पाहिजे होती. मंत्री
गावात येऊन प्रचार करून गेले हे गावकऱ्यांना रुचले नाही. त्यांनी मतदानातून आपला
रोष व्यक्त केला.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84