पुणे, दि. 15 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): चंद्रकांत पाटील यांनी पैठण औरंगाबाद येथे भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक
महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या राष्ट्रीय महापुरूषांविषयी
अवमानकारक वक्तव्य केले व त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. त्याचप्रमाणे
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते संदिप कुदळे यांनी देखील त्यांच्या
सोशल मिडीयावर चंद्रकांत पाटील यांच्या
विधानाचा निषेध करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.
या व्हिडीओ पोस्टचा आक्षेप घेवून
काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदिप कुदळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना
अटक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात
आला.
याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या
शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्त पुणे अमिताभ गुप्ता यांना भेटून निवेदन दिले आणि
झालेल्या प्रकरणाची त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन
दिले की, संदिप कुदळे
यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि झालेल्या प्रकरणावर आम्ही
लक्ष घालू असेही सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सोबत माजी
गृहराज्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, अजित दरेकर, संगीता तिवारी, हनुमंत
राऊत, कामगार नेते सुनिल शिंदे, मुख्तार
शेख आदी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84