Type Here to Get Search Results !

गॅस सिलेंडर स्फोटातील मृतांची संख्या आता दोन; आजीच्या फिर्यादीवरून नातवावर गुन्हा

 

पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): चाकणमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्यांपैकी आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. यातील एकाचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता.

 

चाकणजवळील राणूबाई मळा भागात घडलेल्या या घटनेतील तरुणावर त्याच्या आजीच्या फिर्यादीनुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपूर्वी संबंधित तरुण स्वतः गॅस सिलेंडरची टाकी घेऊन स्वयंपाक घरात गेल्याचे व काडी लावून आत बसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय 95) व अक्षय सुरेश बिरदवडे (वय 19, दोघे रा. राणूबाई मळा, चाकण, ता. खेड) ही या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे (वय 75), वैष्णवी सुरेश बिरदवडे (वय 17), गीतांजली सुरेश बिरदवडे (वय 39) आणि अंजना प्रभाकर केळकर (सर्व रा, राणूबाई मळा, चाकण) अशी यातील जखमी असलेल्या चौघांची नावे आहेत.

 

याप्रकरणी लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेत मृत्यू झाला. अक्षय सुरेश बिरदवडे (वय 19) या त्यांच्या नातवावर भा.दं. वि. कलम 304 (अ) व 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई बिरदवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि. 21 डिसेंबर 2022) सायंकाळी 8:30 च्या सुमारास त्यांचा नातू अक्षय बिरदवडे हा मोठ्या चुलत्यांच्या घरातून गॅस सिलेंडरची टाकी घेऊन आपल्या घरातील स्वयंपाक खोलीत गेला व दार लावून घेतले.

 

गॅस सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचा वास आल्याने घरातील अन्य कुटुंबीयांनी दाराची कडी वाजवून त्याला दार उघडण्यास सांगितले. मात्र, अक्षय स्वयंपाकाच्या खोलीची आतली कडी लावून काहीतरी करत असतानाच गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, घराच्या भिंती कोसळून आणि होरपळून सहा जण जखमी झाले. अक्षय स्वतः आगीत संपूर्ण होरपळला होता. घराच्या भिंती कोसळल्याने त्याखाली अडकून चंद्रभागा बिरदवडे यांचा आणि होरपळलेल्या अक्षय या दोघांचा मृत्यू झाला.

 

चाकण पोलिसांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अक्षय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.