पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): महापालिकेतर्फे अर्बन स्ट्रीट डिझाइनच्या नियमावलीनुसार
पादचारी मार्ग मोठे करणे, सायकल ट्रॅक करणे ही कामे केली जात आहे. यामुळे कर्वे रस्त्यावरील
खंडुजीबाबा चौक ते रसशाळा चौक या दरम्यान पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक
उभारण्याच्या ४१ लाख ५६ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली
आहे.
खंडुजीबाबा चौक ते
रसशाळा या दरम्यान दोन्ही बाजूने दोन मीटरचा पादचारी मार्ग व १.७ मीटरचा सायकल
ट्रॅक केला जाणार आहे. हे काम करताना सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या तीन
लेन कायम राहतील. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही.
गोपाळ कृष्ण गोखले रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरचे काम पूर्ण झाले आहे.
डेक्कन परिसरात खंडुजीबाबा चौक ते शेलारमामा चौक येथील कामही पूर्ण झाले आहे.
त्यापुढे आता रसशाळेपर्यंत कर्वे रस्त्यावर दोन्ही बाजूने पादचारी मार्ग व सायकल
ट्रॅक विकसित केले जाणार आहेत. त्यानंतर या कामांचे पैसे महामेट्रोकडून वसूल
करण्यात येणार आहे.
याच दरम्यान मेट्रोचे गरवारे स्टेशन आहे. मेट्रो स्टेशन खालील पादचारी
मार्ग, सायकल
ट्रॅक व इतर कामांची देखभाल महामेट्रो करणार आहे हे यापूर्वीच ठरलेले आहे. यासाठी
गेल्या वर्षभरापासून महापालिका प्रयत्न करत असली तरीही मेट्रोने अद्याप त्यास
प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने खंडुजीबाबा चौक ते रसशाळा या
दरम्यानचा पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा
निधी भविष्यात नंतर मेट्रोकडून वसूल केला जाईल.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84