पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): आपली बहिण असल्याची ओळख सांगता आणि तिच्याबरोबर लॉजवर
काय करता, असा प्रश्न
तरुणीने वडिलांना विचारत रंगेहाथ पकडले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्याच
मुलीला मारहाण करुन तिला लॉजच्या त्याच खोलीत कोंडून दोघे पसार झाले. ही घटना
हवेली तालुक्यातील कुडजे येथील साहिल लॉजवर २८ डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकटवाडी येथे राहणार्या फिर्यादी यांचे
वडिल कर्वेनगर येथे राहणार्या एका महिलेची आपली बहिण असल्याची ओळख सांगत
तिच्याबरोबर संबंध ठेवून होते. फिर्यादी यांना त्यांच्या संबंधाविषयी संशय होता.
त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या पाळतीवर होती. २८ डिसेंबर रोजी ते दोघे साहिल लॉजवर
गेले असताना फिर्यादीही तेथे गेल्या. तेथे एका रुममध्ये त्यांनी त्या दोघांना
रंगेहाथ पकडले.
ही तुमची बहिण आहे, असे आम्हाला सांगता मग तिला घेऊन येथे लॉजवर
काय करताय, असे वडिलांना तिने विचारले. तेव्हा तिच्या
वडिलांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन रिलिंगवर आपटून फोडला. दोघांनी
तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. हा प्रकार लॉजमधील कामगार पहात होती. त्यांनी फिर्यादी यांचा छातीजवळ हात घालून शर्ट
फाडल्यामुळे कामगारासमोर हा प्रकार घडल्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी तिला
रुममध्ये ठेवून बाहेरुन दरवाजा बंद करुन पळून गेले.
याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६६/२२) दिली आहे. त्यावरुन किरकटवाडी येथे राहणार्या तरुणीचे वडिल आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84