पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्य
सरकारने जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक कृती
आराखड्यातील कामांमध्ये आता स्टार्टअपचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत
मंजूर केल्या जाणाऱ्या जिल्हा वार्षिक आराखड्यातील कामांमध्ये आता स्टार्टअपचा
समावेश करण्यात आला आहे. या समितीने १२ जुलै २०२२ घ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला आहे.
याला राज्याच्या
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीने मान्यता दिली आहे. यामुळे
स्टार्टअप सुरु करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी निधी उपलब्ध होणार आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यपूर्ण विभागाचे ध्येय-धोरणे नव्याने निश्चित
करण्यासाठी शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली होती.
राज्य सरकारने याआधी
२७ ऑगस्ट २०१४ ला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबवावयाच्या नावीन्यपूर्ण
योजनांच्या कार्यपद्धतीबाबतची मार्गदर्शक नियमावली जाहीर केलेली आहे. या नियमावलीत
आता नव्याने स्टार्टअपचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे जिल्हा
परिषदेच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांच्या
निधीच्या माध्यमातून आता स्टार्टअप सुरु करता येणार आहे.
या निर्णयाची पुढील
आर्थिक वर्षापासून (सन२०२३-२४) प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. यानुसार पुणे
जिल्ह्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक कृती आराखड्यात स्टार्टअपसाठी
विभागनिहाय तरतूद केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कृषी, पशुसंवर्धन,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व
बालकल्याण, शिक्षण, आरोग्य,
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, सामाजिक
न्याय, दिव्यांग कल्याण आदी विभागांच्या योजनांद्वारे
बेरोजगार युवक-युवती, शेतकरी, महिला
बचत गट आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या
व्यक्तींना आपापले स्टार्टअप सुरु करता येणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84