पुणे, दि. 14 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी असे नेहमी म्हटले जाते. मात्र सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलचा अतिवापर आणि टीव्ही, एलईडी दिव्यांच्या झगमगाटामुळे दिवसेंदिवस दृष्टी क्षीण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आपण पूर्ण शहरातील नागरिकांच्या दृष्टीचा इलाज करू शकलो नाही तरी किमान आपल्या प्रभागातील नागरिकांची दृष्टी तरी सुदृढ करू शकतो या भावनेतून या नेत्र्तापासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतल्याचे माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.
देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे येथे यशवंतराव चव्हाण सेंटर जतन फाउंडेशन व खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष काका चव्हाण, निवृत्ती येनपुरे, नितीन पाटील, विष्णू सरगर, अरुण पाटील, अनिल गायकवाड, नंदकुमार बोधाई, विठ्ठल पासलकर, नीलम डोळसकर, नंदकिशोर बडदे, धनंजय म्हसे, राजू धोत्रे, राजाभाऊ ताकवले, यशवंत ठोकळ, रघुनाथ ठाकर, मानसी नलावडे, उषा दुर्वे यांच्यासह प्रभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84