पुणे, दि. 15 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर अडचणीत सापडले
आहेत. आश्रमशाळेच्या संस्थाचालकाच्या विरोधात अर्वाच्च वक्तव्य प्रकरणी दिग्दर्शक
महेश मांजरेकर यांच्या विरोधात टेंभूर्णी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर
महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या गाडीचा ज्या
दुसऱ्या गाडीसोबत अपघात झाला ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची होती. महेश
मांजरेकर यांनी त्या संस्थाचालका विरोधात बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप
करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
त्यामुळे पंढपूरमधील माढा न्यायालयाने टेंभूर्णी
पोलिसांना सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
टेंभूर्णी येथील संत रोहिदास आश्रमशाळेचे
संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर यांच्या गाड्यांचा पुणे-सोलापूर
महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी
सातपुतेंची बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप सातपुते यांनी केला होता.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84