Type Here to Get Search Results !

धारेश्वर आंगण मधील फ्लॅटला आग; गॅस गळती झाल्यानंतर देवघरातील दिव्यामुळे आग भडकल्याचा अंदाज

 

पुणे, दि. 22 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी गावच्या हद्दीतील शिवनगर मधील धारेश्वर आंगण या सोसायटीतील सदनिकेत गॅस गळती होऊन आग लागली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, धारेश्वर आंगण या सोसायटीतील चौथ्या मजल्यावरील सदनिकेत पती-पत्नी भाडेकरू म्हणून राहत आहेत. सकाळी दोघेही आवरुन कामावर गेले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सदनिकेतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे इतर रहिवाशांनी पहिले. तात्काळ याबाबत पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. सोसायटीतील इतर रहिवासी तातडीने खाली येऊन थांबले होते.

 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सदनिकेच्या काचा फोडून व दरवाजा तोडून जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्रसंगावधान दाखवत जवानांनी गॅस सिलेंडर मधून सुरू असलेली गॅस गळती बंद केली.

 

आगीत घरातील कपडे व इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. मात्र पुणे पालिकेचे अग्निशमन दल वेळीच पोहोचल्याने जीवीत हानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून गॅस सिलेंडर मधून सुरू असलेली गळती प्रसंगावधान राखून बंद केली.

 

आगीची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी हेमंत राणे व सुनिल परसैय्या हे संबंधित ठिकाणी दाखल झाले होते. संबंधित महिलेने सकाळी देवपूजा केल्यानंतर देवघरात दिवा लावलेला होता. गॅस गळती झाल्यानंतर त्या दिव्यामुळे आग भडकली असावी असा अंदाज पाहणी केल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.