पुणे, दि.1९ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील डिएसके विश्वजवळ, गणेश नक्षञ को ऑप सोसायटी मधील एका सदनिकेत गॅस सिलेंडर संपला म्हणून बदलत असताना गॅस गळती होऊन आग लागण्याची घटना घडली. यामध्ये घरातील दोन जण जखमी झाले आहेत. सिंहगड रोड अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि.17 डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली. गणेश नक्षञ को ऑप सोसायटी मधील ११ व्या मजल्यावर सदनिकेमधे ही आग लागलेली होती. यावेळी सिंहगड रोड अग्निशमन दल आणि नवले अग्निशमन दल जवानांनी धाव घेत सदनिकेत प्रवेश केला असता, तिथे स्वयंपाक घरात घरगुती वापराच्या सिलेंडर मधून वायू गळती होऊन आग लागली होती. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली व घरातील इतर दोन सिलेंडर बाहेर काढत धोका दुर केला.
सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर जोडत असताना मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन जवळच असलेल्या पणतीमुळे आग लागून घरातील आरती राहुल साळवी (वय ३७) जखमी झाल्या असून, त्यांना वाचवायला धावलेले राहुल दिलिप साळवी (वय ४०) यांना देखील आगीची झळ लागली आहे. सदर दोन जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. या आगीमुळे स्वयंपाक घरातील भिंतीला तडे जाऊन घरगुती साहित्याचे बरेच नुकसान झाले आहे.
या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे व तांडेल शिवाजी मुजूमले, जवान भरत गोगावले, शिवाजी आटोळे, विक्रम मच्छिंद्र, औंकार लोखंडे, आदित्य मोरे यांनी सहभाग घेतला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84