Type Here to Get Search Results !

नवीन वर्षाची पुणेकरांना भेट; ५ जानेवारीला मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर

 


पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 5 जानेवारी रोजी पुण्यातील संचेती रुग्णालयात 29 वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीरहोणार आहे.

 

विश्वविख्यात प्लॅस्टिक सर्जन स्व. डॉ. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन 2 लाख 88 हजारांहून अधिक मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या. गेल्या 11 वर्षापासून त्यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अमेरिकेतील त्यांचे शिष्य प्रसिध्द प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ.लॉरेन्स ब्रेनर, लिंडा पॅटरसन या शस्त्रक्रिया करतात.

 

संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी ही माहिती दिली. येत्या 5 ते 8 जानेवारी 2023 च्या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष आनंद छाजेड यांनी दिली.

 

या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य होतील. कोविड मुळे यंदा चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत.

 

अधिक माहितीसाठी विजय पारख 98224 24316 व राजेंद्र सुराणा 93710 23161 यांच्याशी संपर्क साधावा.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.