Type Here to Get Search Results !

दूधवाला बनून पहाटेच्या चोऱ्या करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): तुमच्या दूधवाल्याचा पाहुणा आहे किंवा त्याची ओळख सांगून शहरातील बंगल्यातील व सोसायटीतील वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

 

या टोळीने बार्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन महिलांच्या गळ्यातील दागिने देखील चोरले होते. दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या त्या तरुण चोरट्यांच्या नावे पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर, शिरूर, सातारा (शिरवळ) येथील पोलिसांत अशाच प्रकारच्या एकूण १४ गुन्ह्यांची नोंद आहे.

 

गुन्ह्यांची पद्धत अजब असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून दुचाकीवरून जाणाऱ्या चोरट्यांचा तपास सुरूच ठेवला. जवळपास १०० ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून शहर पोलिसांनी अखेर त्या चोरट्यांना शोधलेच.

 

अशोक ऊर्फ डॉन नामदेव गंगावणे व अशोक ऊर्फ कंट्या विश्वनाथ गंगावणे व अनिल रघुनाथ बिरदवडे (तिघेही रा. बांदलवाडी, ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. तिघांना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार यांनी पार पाडली.

 

त्यांना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, संदिप पाटील, श्री. महाडिक यांच्या पथकांचीही मोठी मदत झाली.

 

गवळ्याच्या व्यवसायाशी संबंधित त्या तिघांनी सुरवातीला पुणे शहरातील महिलांना टार्गेट केले. त्या ठिकाणी पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांनी पुणे शहर सोडले आणि पुणे ग्रामीणमध्ये दूधवाल्याचा बहाणा करून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले. तेथील पोलिसांनी त्यांना पकडले होते आणि तेथून सुटल्यावर त्यांनी साताऱ्यात तसाच प्रकार सुरू केला. सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्या तिघांनी सोलापूर शहराला टार्गेट केले. शहरातील बंगले व सोसायट्यांतील महिलांबद्दल जाणून घेतले.

 

दूधवाला आल्यावर दूध घ्यायला कोणती महिला येते, तिच्या गळ्यात दागिने असतात का, याची माहिती त्यांनी मिळवली. त्यानंतर दूधवाल्याचे नाव जाणून घेऊन त्या तिघांनी विजापूर नाका, जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील तीन महिलांना तुमच्या दूधवाल्याचा पाहुणा असल्याचे सांगून चार लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिली.

 

दुचाकी चालवताना महिलेच्या गळ्यातील दागिने चोरल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालवणारा मागे बसायचा आणि मागे बसलेला दुचाकी चालवायचा. पोलिसांना अंदाज येऊ नये म्हणून त्यांनी अनोखी शक्कल अवलंबली. रात्रीच्या सुमारास बारामतीवरून शहराजवळ यायचे आणि दूधवाल्याच्या वेळेत ते महिलांना फसवत होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.