पुणे, दि. 15 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): एका 18 वर्षीय तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन तो इन्स्टाग्रामवर
अपलोड करुन विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नाशिक येथील रहिवासी
असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीला इन्स्टाग्रामवर मेसज करुन
तिचा सोशल मीडियावर पाठलाग केला. तरुणीचा चेहरा असलेला
अर्धनग्न फोटो एडीट करुन तो इन्स्टाग्राम व्हायरल केला. हा प्रकार
तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध
तक्रार दिली.
याबाबत कर्वेनगर येथील 18 वर्षीय
तरुणीने सोमवारी (दि. 12 डिसेंबर २०२२) कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार
सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी नाशिक
येथील एका व्यक्तीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी
आरोपीविरुद्ध आयपीसी 354, 354 ड/2, 500, आयटी
अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील
तपास पोलीस करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84