Type Here to Get Search Results !

पैसे पाठवूनही माल मिळाला नाही, कंपनीची फसवणूक

 

पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): औद्योगिक क्षेत्रातील फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीला कच्चा माल पाठवतो म्हणून ४ लाख ३८ हजार ९६० रूपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार २२ डिसेंबर २०२२ मध्ये घडला. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ओंकार चंद्रमोहन सावंत (वय २७ रा. सावंत बंगला, गोपाळीवाडी रोड, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

 

याप्रकरणी एकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश माधवराव वाकोडे असे गुन्हा दाखल असलेल्याचे नाव आहे. हा व्यवहार ऑनलाईन पध्दतीने झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनी असून येथे पी. व्ही. सी. पाईप तयार होतात. त्यासाठी कंपनीला पीव्हीसी रेझीन हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात लागतो.

 

गुरूवारी (दि. २२ डिसेंबर 2022) फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनी मेलवर मरूधर इंटरनॅशनल फर्मवरून आकाश माधवराव वाकोडे यांनी मेलवरून कोटेशन पाठवून पी. व्ही. सी रेझीन हा कच्चा माल ९३ रूपये प्रति किलो प्रमाणे ४ हजार किलो देण्याचे ठरवले होते. त्यानुसार फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीच्या (आयसीआयसीआय दौंड शाखा) खात्यावरून मरूधर इंटरनॅशनल फर्म याच्या एचडीएफसी बॅक (एसपी रिंग रोड अहमदाबाद) खात्यावर ४ लाख ३८ हजार ९६० रूपये आरटीजीएसच्या माध्यमातून कंपनीच्या खात्यावरून ऑनलाईन पध्दतीने पाठवले. त्यांना पैसै पोहच झाल्यानंतर त्यांनी फिर्यादीला फोन करून गायत्री वेअर हाऊस पारसनाथ कॉम्प्लेक्स दापोडी भिवंडी जि. ठाणे येथे गाडी पाठवून देण्यास सांगितले.

 

त्यानुसार ट्रान्सपोर्टची गाडी पाठवली आणि आकाश वाकोडे याला तसे फोन करून सांगितले असता आकाश वाकोडे याने दहा मिनिटात सांगतो म्हणून फोन कट केला. नंतर बऱ्याचदा प्रयत्न केला. मात्र, फोन बंद लागत होता. पैसे पोहोचले; मात्र, त्याबदल्यात ठरलेला कच्चा माल फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीला पाठवला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.