Type Here to Get Search Results !

ट्रॅव्हल्समध्ये चढून चार ते पाच जणांच्या टोळक्याने चालकाच्या मानेवर केले वार

 

पुणे, दि. 23 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सोलापूर-पुणे मार्गावरून जात असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये चार ते पाच जणांचे टोळके चढले. मग त्यांनी चालकाच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न केला. हा प्रकार कुंजीरवाडी येथे घडला होता.

 

गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हेशाखेची पथके त्यांचा शोध घेत होती. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीहवलदार नितीन मुंढे यांना गुन्ह्यातील आरोपी हे हडपसर येथील उद्यानाशेजारी असलेल्या एका मैदानात बसल्याचे समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता आरोपी त्यांना पाहून पळत असताना त्याला पकडले.

 

या प्रकरणी अचंबित करणारी गोष्ट म्हणजे गुन्हे शाखेच्या युनिट सहाने दोघांना अटक करीत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. रोहित अरुण पवार (वय-२०) आणि आदित्य संजय लोखंडे (वय-२०, रा. शिवमंदिराजवळ, गोंधळेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर यांच्या पथकाने केली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.