Type Here to Get Search Results !

पत्नी नांदायला येत नसल्याने पत्नी’सह सासूवर देखील कुऱ्हाडीने केले वार



पुणे, दि. 15 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):  माहेरहून नांदण्यासाठी न येणार्‍या पत्नीवर पतीने सासरी जाउन कुर्‍हाडीने वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर भांडणात मध्यस्थी करणार्‍या सासूवरही त्याने वार करून जखमी केले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणावरून चेतनची पत्नी आईकडे राहण्यासाठी गेली होती. त्यामुळे चेतनला राग आला होता. त्याच रागातून त्याने 12 डिसेंबरला सासरी जाऊन पत्नीला घरी येण्याबाबत विचारणा केली. तिने नकार देताच, तुझा मर्डरच करतो असे बोलून कुर्‍हाडीने वार केले. सासूने मध्यस्थी केल्यामुळे त्याने त्यांच्यावरही वार करून गंभीर जखमी केले.

 

या प्रकरणी चेतन जंगले याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 27 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. ही घटना 12 डिसेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास फुरसुंगीत घडली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.