Type Here to Get Search Results !

खडकवासल्याजवळ पुन्हा गव्याची दहशत; बैलावर केलेल्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

 


पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) हद्दीलगत खडकवासला धरणभागात एका मस्तवाल रानगव्याने धुमाकूळ घातला आहे. धरणाच्या तीरावरील कुडजे येथे रानात चरत असलेल्या बैलावर हल्ला केला. त्यात बैल जागीच मरण पावला.

 

हा प्रकार काल रविवारी (दि. 18 डिसेंबर २०२२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळी सुदैवाने शेतकरी शरद एकनाथ पायगुडे हे गोठ्यात होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 

गेल्या चार-पाच दिवसांपासून एका मस्तवाल रानगव्याचा कुडजे-अहिरे परिसरात धुमाकूळ सुरू आहे. ज्वारी, भाजीपाला अशा पिकांचे रातोरात नासाडी करीत आहे. रानगव्याच्या हल्ल्यात जनावर ठार होण्याची ही वन खात्याच्या इतिहासात पहिलीच घटना आहे. त्यामुळे वनविभाग अचंबित झाले आहे.

 

हल्ल्यात ठार झालेला बैल तीन ते चार वर्षे वयाचा आहे. बैल, म्हैस समजून रानगव्याच्या मागे फिरत होता. आदल्या दिवशीही रानगवा कुडजे परिसरात आला होता. काल सायंकाळी बैल रानगव्याच्या मागे पळत आला आणि त्यामुळे चिडून रानगव्याने बैलावर जोरदार हल्ला केला, त्यात बैल जागीच ठार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बैलाने म्हटले 'आ मुझे मार'.

 

काल दुपारी शरद पायगुडे, मारुती मारणे हे कुडजे येथील श्री काळूबाई मंदिराजवळील आपल्या शेतात ज्वारी पिकांची राखण करीत होते. त्या वेळी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एनडीएच्या हद्दीतून भलामोठा रानगवा शेतात शिरला.

 

त्यामुळे पायगुडे व इतर शेतकर्‍यांनी जोरदार आरडाओरडा करीत रानगव्याला पिटाळून लावले. त्या वेळी एक बैल रानगव्याच्या पाठीमागे धावत गेला. रानगव्याच्या मागोमाग बैल तेथून दूर अंतरावर एका शेतात गेला. तेथे मागे फिरून चिडलेल्या मस्तवाल रानगव्याने बैलावर जोरदार हल्ला केला.

 

बैलाच्या शिंगावर, तोंडावर जोरदार धडका मारल्या. त्यात शिंगे, कानातून रक्तस्राव होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला.  सायंकाळी शरद पायगुडे यांनी चरण्यासाठी रानात सोडलेली म्हैस, एक बैल परत आले. मात्र, एक बैल परत आला नाही.

 

त्यामुळे त्यांनी रानात धाव घेतली असता बैल ठार झालेला दिसला. रात्री उशिरा पोलीस पाटील दत्ता पायगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन खात्याला माहिती दिल्यानंतर सोमवारी (दि. 19 डिसेंबर २०२२) दुपारी खडकवासला वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे, वनरक्षक सुनीता सुभेदार या पथकासह दाखल झाल्या.

 

पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, घटनास्थळी जाऊन मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला आहे. शासननिर्णयानुसार शेतकरी शरद पायगुडे यांना भरपाई देण्यात येणार आहे.

 

“रानगव्याने जनावर ठार मारण्याचा हा वनविभागाच्या इतिहासात पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी केली असता, धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.” असे खडकवासला वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे यांनी सांगितले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.