Type Here to Get Search Results !

वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे हडपसर येथे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन

 

पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनने ५५ व्या वार्षिक अधिवेशनाचे २० ते २२ जानेवारीदरम्यान हडपसर-मगरपट्टा परिसरातील मेस्सी ग्लोबल येथे आयोजन केले आहे.

यात भारतासह युरोप, जपान आणि ब्रिटनमधील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आयोजक समितीचे अध्यक्ष सुभाष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'शाश्‍वत पाणीपुरवठा व सार्वजनिक आरोग्य-सर्वांसाठीची उपलब्धता' हा या अधिवेशनाचा मुख्य विषय आहे.

 

भुजबळ म्हणाले, ''तीन दिवसीय अधिवेशनात विविध विषयांना हाताळण्यात येणार आहे. त्यामध्ये हर-घर जल आव्हाने व उपाय, चोवीस तास पूर्ण आठवडा पाणीपुरवठा-शहरी व ग्रामीण भागासाठी, शहरी व ग्रामीण भागातील सांडपाणी नियोजन, मानवी विष्ठेचे व्यवस्थापन, मैलापाणी शुद्धीकरण आदींचा समावेश असेल. तसेच जलजीवन अभियान आणि अमृत या विशेष सत्रांचे आयोजन केले आहे. तरुणाईला प्रोत्साहित करण्यासाठी पोस्टर स्पर्धा ठेवणार आहे. अधिवेशनात भव्य प्रदर्शन होणार असून त्यात अत्याधुनिक यंत्रे आणि उपकरणे तसेच तांत्रिक माहिती दिली जाणार आहे.''


या प्रसंगी 'आयडब्ल्यूडबल्यूए'चे सचिव दयानंद पानसे, ए. एम पाटील, तांत्रिक समितीचे डॉ. पराग सरगे, वसंत शिंदे आदी उपस्थित होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.