Type Here to Get Search Results !

ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षाच्या मुलीला कपडे उतरवायला लावले आणि केले नको तेच

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस उघडकीस येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. राजेंद्र दगडु गायकवाड असे या उद्योजकाचे नाव आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उद्योजक राजेंद्र गायकवाड हा पीडितेच्या घरी आला होता. यावेळी त्याने पीडित मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं अमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीने ऑडिशन घेण्याच्या कारणावरून, पीडितेच्या आई-वडीलांना घरातून बाहेर पाठवलं आणि आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला कपडे उतरवायला लावले. पीडित मुलीने कपडे उतरवताच, आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी सुद्धा दिली.

 

पीडित मुलीला धमकी देऊन राजेंद्र गायकवाड हा तेथून पसार झाला. या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली. तिने हा सर्व प्रकार आई-वडीलांना सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच, पीडितेच्या आई-वडीलांनी तातडीने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.

 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी राजेंद्र दगडु गायकवाड याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उद्योजक फरार झाला असल्याचे कळाले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.