पुणे, दि. 19 डिसेंबर २०२२ (चेकमेट
टाईम्स): मालेगाव
बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम एस
पी कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे.
कर्नल पुरोहित 2008 मधील
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहेत. ज्यात 6 लोकांचा
मृत्यू झाला होता तसेच अनेकजण जखमी झाले होते. असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल
आहेत.
दरम्यान पुस्तक प्रकाशन करु नये
अशी विनंती आम्ही केली असून पुस्तक प्रकाशन होऊ देणारं नाही असे पुरोगामी
संघटनांकडून सांगण्यात आलं. तसेच आंदोलनाचा इशारा देखील पुरोगामी विचारसरणीच्या
संघटनांनी दिला होता.
या पुस्तकाविरोधात
पुण्यात पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या असून या पुस्तकाच्या प्रकाशनाला जोरदार
विरोध केला जात आहे. यावेळी एस पी कॉलेज पासून जवळ असलेल्या एका ठिकाणी
पुरोगामी संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले. या प्रकाशन कार्यक्रमासाठी एस पी कॉलेज
बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर एस पी कॉलेज
परिसराला पोलिसांच्या छावणी चे स्वरूप आले आहे.
लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या
'द मॅन बेट्रेड' ( the man battered) या पुस्तक
प्रकाशनाला पुरोगामी विचारांच्या संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. पुस्तकाचे
प्रकाशन आपल्या महाविद्यालयात होऊ देऊ नका अशी विनंती देखील या कार्यकर्त्यांनी एस
पी कॉलेजच्या प्राचार्यांकडे केली होती.
स्मिता मिश्रा लिखित या
पुस्तकाचे जयंत उमराणीकर, सत्यपाल सिंग यांच्या हस्ते प्रकाशन होणार
आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84