पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
मकर संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलांसह
तरुणांमध्येही पतंग उडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, पतंग उडविण्याचा आनंद घेतानाच
तरुणांमध्ये पतंगाची स्पर्धा लागत असून त्यातून विरोधी स्पर्धकाचा पतंग
कापण्यासाठी घातक मांजाचा वापर केला जात आहे.
दौंड येथे ५ डिसेंबर
२०२२ या दिवशी मांजाने गळा कापला गेल्याने पन्नालाल यादव यांचा मृत्यू झाला होता.
यापूर्वीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन तरुणींचा मांजाने गळा कापल्याने
मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दरवर्षी मांजामुळे हजारो पक्षी जखमी होत
असल्याची सद्यःस्थिती आहे.
मांजाची विक्री
करणारे व त्याचा वापर करणाऱ्या दोघांनाही जबर दंड करावा. तसेच मांजामुळे मानवासह
पक्षी, प्राण्यांच्या
जिवाला धोका आहे, हे माहीत असूनही त्याची विक्री करणाऱ्यास
सश्रम कारावासाची शिक्षा द्यायला पाहिजे, तेव्हाच
त्यांच्यावर जरब बसेल, असा संताप सर्वसामान्य नागरिकांनी
आपल्या प्रतिक्रियांमधून व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींनी महापालिका व पोलीस
प्रशासनाला धारेवर धरुन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे,
अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
त्यानंतरही आता घातक
मांजाची सर्रासपणे बेकायदा विक्री सुरू असल्याच्या प्रकारावर ‘चेकमेट टाईम्स’ने वृत्ताद्वारे प्रकाश टाकला. मांजाबाबत वृत्त
प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
त्या पुढीलप्रमाणे-
भारतात दरवर्षी नायलॉन
मांजामुळे असंख्य जीवघेण्या घटना घडतात. मांजामुळे अनेकदा नागरिकांचे जीव जातात, ते जखमी होतात.
मकर संक्रांतीच्यावेळी ‘पतंग महोत्सव’ भरवून
त्यामध्येही मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा प्रकारे मांजाचा
वापर व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.
- अरविंद कोपर्डे
मांजाचा वापर करणाऱ्यांकडून ५
हजार रुपये दंड करावा. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर थेट ५० हजार
किंवा एक लाख रुपये इतका दंड आकारावा. तसेच मांजा विक्री करणारा व खरेदी करणाऱ्या
दोघांवरही गुन्हा दाखल करावा.
- विराज
मांजाबाबत नागरिकांनीही सतर्क
राहीले पाहिजे. मांजा विक्री करताना कोणी आढळल्यास त्याबाबत तत्काळ पोलिसांना
माहिती द्यायला हवी. तरच कोणाचा तरी जीव वाचू शकेल.
- जयंत महाबोले, सहकारनगर
मांजा विक्री
करणाऱ्या विक्रेत्याला ५० हजार रुपये, तर मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्याला एक लाख
रुपये दंड आकारला पाहिजे. तसेच एखाद्याचा जीव मांजामुळे गेल्यास संबंधितांना किमान
१५ वर्षांचा कारावास झाला पाहिजे. तेव्हाच, त्यांच्याकडून
मांजाचा वापर टाळला जाईल.
- शकील सॅण्डी.
मलाही एकदा पायामध्ये मांजा अडकलेले
कबुतराचे पिलू सापडले होते. तो मांजा कसाबसा काढला, त्या पिलाला पाणी पाजून सोडून दिले. एका मांजामुळे अशा
कितीतरी पक्षी, प्राणी व माणसांवरही गंभीर दुखापतीची वेळ आली
आहे.
- कीर्ती बिवलकर
धोकादायक नायलॉन व चिनी
बनावटीचा मांजा कसा व कोठून विक्रीस येतो? हे शोधून पोलिसांनी थेट मुळावर घाव
घातला पाहिजे. तेव्हाच विक्रेते सुधारतील आणि घातक मांजा विक्री करण्याचे
थांबवतील.
- रत्नाकर चांदेकर, सदाशिव पेठ
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84