पुणे, दि. 19 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): कौटुंबिक
वादातून कल्याणीनगर येथील एका जोडप्याने घटस्फोट घेतला. त्यातील पतीने काही
दिवसांनी दुसरे लग्न केले. मात्र दुसऱ्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे
त्याला समजले. त्याचा जाब विचारल्यानंतर तिने मानसिक त्रास दिल्याने पतीने गळफास
घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चार ऑक्टोबर रोजी
कल्याणीनगर येथील लॅडमार्क सोसायटीत झाली होती.
आत्महत्या
करण्यापूर्वी शर्टच्या कॉलरला सुसाईड नोट लिहून ठेवण्याने हा प्रकार उघड झाला आहे.
किरण रामचंद्र जाधव (वय ४७,
रा. कल्याणीनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, किरण जाधव आणि त्याची पहिली पत्नी यांच्यात घटस्फोट झाला आहे. त्यानंतर
त्यांनी गीता नावाच्या तरुणीची लग्न केले. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना
गीताचे कुलदीप नावाच्या तरुणाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले. त्याचा
त्यांनी जाब विचारल्यावर गीताने त्याची कबुली दिली. त्यानंतर ती सतत प्रियकराबरोबर
फिरत असे. तसेच जाधव यांच्या पैशाचा
गैरवापर करत होती. गीताचा प्रियकर वारंवार त्यांच्या घरी येऊन त्यांच्याकडून पैसे
उकळत होता.
या सर्व बाबींचा मानसिक
त्रास होत असल्याने जाधव यांनी ४ ऑक्टोबर रोजी घरी गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी दुसरी पत्नी, तिचा प्रियकर व पत्नीचे नातेवाईक यांच्या
विरुद्ध तक्रार अर्ज लिहला. तो तक्रार अर्ज शर्टच्या कॉलरला लावून त्यांनी
आत्महत्या केली.
या प्रकरणी त्यांच्या
पहिल्या पत्नीच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी
त्यांची दुसरी पत्नी गीता जाधव (वय ४९), तिचा प्रियकर कुलदीप मधुसूदन मोकाशी (वय ४४,
रा. निगडी) हृदयनाथ दीनानाथ सल्ले (वय ३४, रा.
उंड्री) आणि एका २९ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
येरवडा पोलिसांनी
सुरवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू, अशी नोंद केली होती. मात्र तपासावरुन आता
गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड या गुन्ह्याचा तपास
करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84