Type Here to Get Search Results !

कोथरूड मधील त्या तरूणाचा खूनच; शवविच्छेदन अहवालात आला धक्कादायक प्रकार समोर

 

पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): पूर्वी झालेला वाद आणि एकत्र दारू पिताना झालेल्या भांडणातून आपल्याच मित्राचा खून करणार्‍या तरूणाला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

खून झालेला तरूण आणि आरेापी हे दोघेही मित्र असून उच्च शिक्षित आहे. तसेच दोघेही कॉलसेंटरमध्ये नोकरीस होते. दोघांमध्ये पुर्वी वाद झाले होते. परंतु त्यांची मैत्री होती. घटनेच्या दिवशी ते दारू पिण्यासाठी एकत्र बसले असताना त्यांच्यात पूर्वीच्या त्या भांडणावरून पुन्हा वाद झाले. याच वादातून आरोपीने दुसऱ्या तरुणाचा गळा आवळून खून केला.

 

परेश शंकर कंदारे (29, वय रा. साईकृपा बिल्डींग, लोकमान्य कॉलनी कोथरूड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना हा खूनाचा प्रकार असल्याचे परिस्थिती जन्य पुरव्यावरून समजले. याप्रकरणात आणखी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आल्यानंतर अहवालातही खून केला असल्याचा प्रकार निष्पन्न झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बोलवून त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर त्याने दारू पिल्यानंतर आपल्याकडून हे कृत्य झाले असल्याचे सांगितले. त्याच्या खून प्रकरणी वसंत अवसरे (28, कोथरूड, लोकमान्यनगर) याला अटक करण्यात आली आहे.

 

शवविच्छेदन अहवालात खून केला असल्याचा प्रकार स्पष्ट झाला असून आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे कोथरूड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.