पुणे, दि. 19 डिसेंबर २०२२ (चेकमेट
टाईम्स): विवाहित
तरुणाचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, बबलू यांनी मुस्लिम विधवेबरोबर सन २०१८ मध्ये
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथे लग्न केले होते. बबलू हे दौंड येथे भीमा नदीकाठी
वीट भट्टीत मजुरी करीत होते. कुमेल कुरेशी व त्याच्या साथीदारांनी बबलू यांच्या
पत्नीला घटस्फोट घेण्यास सांगितले. परंतु, तिने नकार
दिला. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२२ रोजी कुमेल कुरेशी याच्यासह तिघांनी बबलू यांची
बळजबरीने सुंता केली.
या प्रकारानंतर
चव्हाण कुटुंब भीतीपोटी दौंड सोडून गेले होते. या प्रकरणी तिघाजणांविरूद्ध
अॅट्रोसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
बबलू मिलिंद चव्हाण (वय २८, हल्ली रा. परदेशी बिल्डिंग, कुंभार गल्ली, दौंड) यांनी यासंदर्भात फिर्याद
दिली.
त्यानुसार, कुमेल
कुरेशी ऊर्फ हाजीसाहब (रा. कुंभार गल्ली, दौंड), आसिफ शेख (पूर्ण नाव उपलब्ध नाही) व एका डॅाक्टरविरूद्ध गुन्हा दाखल
केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिन्ही संशयित आरोपी
फरार असून,
त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी शनिवारी (ता. १७ डिसेंबर २०२२) दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84