Type Here to Get Search Results !

कुटुंबाचे संवर्धन व चिरंतन कल्याणासाठी कुटुंब प्रबोधन महत्वाचे; संजय कुलकर्णी यांचे प्रतिपादन

 



पुणे, दि.१५ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): नुकत्याच झालेल्या श्रद्धा वालकरच्या अमानुष हत्याकांडाच्या निमित्ताने पाल्य आणि पालकांनी अंगिकारलेली आधुनिक जीवनपद्धती, आपल्या कुटुंब व्यवस्थेत एकंदरच आलेला तणाव, मुलांची बदलत चाललेली मानसिकता, वेगाने ढासळत चाललेली लग्न संस्कृती, समाज व्यवस्थेबाबतची उदासिनता अशा अनेक ज्वलंत विषयांवर विस्तृत चर्चा करण्यासाठी वेदांत सांस्कृतिक मंच कर्वेनगर तर्फे कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहामध्ये शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सर्व वयोगटासाठी ‘आधुनिक कुटुंब - वास्तव आणि अपेक्षा' या विषयावर एका खुल्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समुपदेशक व कुटुंब प्रबोधन पश्चिम प्रांत प्रमुख संजय कुलकर्णी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. परिसंवादाच्या समारोप प्रसंगी आपल्या भाषणात ते म्हणाले," बाह्य जगातील आर्थिक,सामाजिक आव्हाने,समाजातून जाणीवपूर्वक उभे केलेले चुकीचे विमर्श व परिणामी वाढीस लागलेली स्वकेंद्रित व भोगवादी, चंगळवादी वृत्तीमुळे समाजामध्ये पुन्हा एकदा कुटुंब प्रबोधनाचे कार्य हाती घेणे आवश्यक झाले आहे."

या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, समुपदेशक, राजकीय कार्यकर्ते, पोलीस अधिकारी यांच्या बरोबर कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संजय कुलकर्णी यांनी मुलींकडूनच आधुनिक, कुटुंब, वास्तव आणि अपेक्षा या शब्दांच्या संकल्पना काढून घेतल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थिनींचा सहभाग वाढतच राहिला. "जास्त आधुनिकतेच्या आहारी न जाता, आपल्या कुटुंबाबरोबर सुसंवाद साधून त्यांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घेऊन आपल्याही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत याचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि सध्या तरी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे" असे आवाहन संजय कुलकर्णी यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास, उपाध्यक्ष विद्या कुलकर्णी, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, समुपदेशक मिताली सावळेकर, मेधा भोजकर, महिला पोलीस उप निरीक्षक तृप्ती पाटील, स्नेहलता जाधव यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच संस्थेचे शिक्षक, समुपदेशक आणि पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत युवतींना मार्गदर्शन लाभले.

परिसंवाद कार्यक्रम यशस्वितेसाठी वेदांत सांस्कृतिक मंचाच्या मंजिरी जोशी यांनी परिश्रम घेतले. त्यांना विनायक बेहेरे, सतीश आठवले, उमेश गानू, हेमंत सेलमोकर, विवेक बाखरे, जतीन तळेकर, राहूल जोशी, मंदार जोशी, डॉ.भारवी जोशी, डॉ.रसिका जोशी, जयश्री धुपकर, डॉ प्रीतम सेलमोकर यांनी सहयोग केला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.