Type Here to Get Search Results !

दुसऱ्याला शिकवावे तत्वज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण; सरकारी वाहनांचे हे आहेत अक्षम्य अपराध

 

पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): सर्व वाहनांना पीयूसी (पोल्यूशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र सक्तीचे असताना ९० टक्क्यांहून अधिक सरकारी वाहने पीयूसीशिवाय फिरत आहेत. एवढेच नाही, तर काही वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेटही नसल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

सर्वसामान्य वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात असताना, सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत केंद्र सरकारने सायकल वगळता सर्व वाहनांना पोल्यूशन अंडर कंट्रोल (पीयूसी) प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. जुन्या वाहनांसह नियमित देखभाल-दुरुस्ती न केल्या जाणाऱ्या वाहनांमधून सर्वाधिक वायू प्रदूषण होते. प्रशासनाकडून सध्या देशातील वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत पीयूसी सक्ती जाहीर झाली आहे. वाहनचालक वाहतूक पोलिसांना पीयूसी प्रमाणपत्र दाखवू शकला नाही, तर त्याच्याकडून दहा हजार रुपयांपर्यंचा दंड आकारला जाऊ शकतो.

 

सरकारी वाहनांकडून सिग्नलचे पालन न करणे, ‘नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावणे, एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने गाडी चालविण्याच्या घटना सातत्याने उघड होतच असतात. सजग नागरिक या गाड्यांची छायाचित्रेही वर्तमानपत्रांकडे, सोशल नेटवर्किंग साइटवर वेळोवेळी प्रसिद्ध करतात; पण याही पलीकडे जाऊन वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे बाळगण्यातही सरकारी अधिकारी हलगर्जीपणा करीत असल्याचे सिस्कॉम संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

 

सिस्कॉम (सिस्टीम करेक्टिंग मूव्हमेंट) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून सरकारी व्यवस्थांमधील त्रुटी, उणिवांचा अभ्यास करून त्या सुधारण्यासाठी सरकारला नवे पर्याय देण्याचे काम करते. सरकारी वाहने वाहतुकीचे नियम पाळतात का, याची पाहणी करण्यासाठी संस्थेने नुकताच ८५ सरकारी गाड्यांचे नमुना सर्वेक्षणकेले. या वाहनांचे नेक्स्टजेन एमपरिवहनया अॅपवरून माहिती घेतली असता दोन वाहने वगळता ८० वाहनांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. या वाहनांनी पीयूसी प्रमाणपत्र काढलेले नाही; तसेच यातील एका वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचेही आढळून आले.

 

वाहन ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या नावावर आहे, त्याने वाहन सुस्थितीत ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे कसोशीने पालन करण्याची जबाबदारी असताना, अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य वाहनचालकांच्या हात धुवून मागे लागणाऱ्या, निरनिराळ्या कारणांवरून जनतेला वेठीस धरणाऱ्या, रस्त्यावर अडवणूक करणाऱ्या वाहतूक व परिवहन विभागाच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे. विशेषतः वाहतूक विभाग आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्याचांही यात समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगतरीत्या दंडाची वसुली आणि नियमानुसार खटल्याची कारवाई आवश्यक आहे, अशी मागणी सिस्कॉम संस्थेने केली आहे.

 

यावर सिस्कॉमचे कार्याध्यक्ष राजेंद्र धारणकर म्हणाले,”सरकारी वाहनांची नोंदणी त्या विभागाच्या प्रमुखपदी असलेल्या वर्ग एक आणि त्यावरील अधिकाऱ्यांच्या नावाने होते. सर्वोच्च पदावर कार्यरत अधिकाऱ्यांकडून प्रदूषण कायद्याचा भंग होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या दुर्लक्षाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवहन विभागाचे आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे.”

 

पीयूसी नसलेल्या गाड्या

- पोलीस आयुक्तालय (सर्वाधिक वाहने)
- वाहतूक विभाग
- जिल्हाधिकारी कार्यालय
- मुख्य वनसंरक्षक कार्यालय
- पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश कार्यालय
- सरकारी आरोग्य विभाग

- येरवडा कारागृह कार्यालय

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.