पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
महापालिका प्रशासन, तसेच केंद्रीय आणि राज्य प्रदूषण
नियंत्रण मंडळाने शहरात मागील दोन दिवसांत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत,
बंदी असलेल्या तब्बल 950 किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करून त्याबरोबरच 55 हजारांचा दंडही वसूल
केला.
यामध्ये पहिल्या
दिवशी 450 किलो तर दुसऱ्या दिवशी सुमारे 500 किलो प्लॅस्टिक जप्त केले. 9 ठिकाणी
केलेल्या कारवाईत सुमारे 55 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला अशी माहिती
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
पर्यावरणास घातक
असलेल्या प्लॅस्टिकवर बंदीसाठी 2018 मध्ये कायदा केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी
या तीनही विभागांकडून संयुक्त कारवाई केली जाते. त्या अंतर्गत मंगळवारी आणि
बुधवारी या संयुक्त पथकाने महात्मा फुले मंडई, मार्केटयार्ड आणि वाघोली परिसरात कारवाई
केली.
केंद्रीय प्रदूषण
नियंत्रण मंडळाचे शशिकांत लोखंडे, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संदीप पाटील, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक इमामुद्दीन इनामदार, राजेश
रासकर, उमेश देवकर यावेळी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84