Type Here to Get Search Results !

नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली

 


पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): मागील काही दिवसांपासून पुण्याच्या पोलीस आयुक्त पदी कोण विराजमान होणार, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. अखेर राज्य सरकारने रितेश कुमार यांची नियुक्ती केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला.

 

नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रितेश कुमार यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले.

 

सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात आले. उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले.

 

राज्य सरकारच्या गृह विभागातर्फे 13 डिसेंबर रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान, रितेश कुमार हे सोमवारी पदभार स्वीकारणार होते, मात्र त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच पोलीस आयुक्तालयात हजेरी लावून पदभार स्वीकारला.

 

त्यानंतर मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे यांच्यासह सर्व परिमंडळाचे, विभागाचे पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते. रितेश कुमार यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.