Type Here to Get Search Results !

'पीएमपी'कडून दीडशे मिडी बसचा करार रद्द; स्वत:च्या बसेस वाढवण्याचा ओमप्रकाश बकोरीयांचा प्रयत्न


पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात आलेल्या 150 मिडीबसचा करार रद्द करण्यात आला आहे. यासर्व बस पीएमपी मार्फत संचलनात आणाव्यात, असा आदेश पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत.

पीएमपीच्या ताब्यात एकूण 2142 बस आहेत. यातील 1130 बस ठेकेदाराच्या तर 1012 बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. पीएमपीच्या स्वमालकीच्या बस देखभाल दुरूस्तीसाठी पीएमपीचे वर्कशॉप असून येथे  तांत्रिक काम करणारे कर्मचारी आहेत. पीएमपीत कर्मचारी आणि वर्कशॉप असताना या बस ठेकेदारांना देखभाल दुरूस्ती करू दिल्याने पीएमपीवर चौफेर टीका होत होती. तसेच या बस ठेकेदारांना चालवायला दिल्याने स्वमालकीच्या बसची संख्या कमी झाली होती.

 

पीएमपी प्रशासनाने ऑक्‍टोंबरमध्ये 117 मिडीबस आणि 33 तेजस्विनी बसेसच्या ड्रायव्हरसह देखभाल दुरूस्तीसाठी बस ट्रान्सलिंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार केला होता. प्रति किलोमीटरसाठी 42.99 रूपये दर निश्‍चित केले होते. स्वमालकीच्या बस ठेकेदाराला देखभाल दुरूस्तीसाठी दिल्याने पीएमपी प्रशासनावर चौफेर टिका झाली होती.

 

पीएमपीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपीचे कारभार हाती घेण्यापुर्वीच हा करार झाला होता. यासाठी बकोरिया यांनी 150 बसचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक बोलविली होती. पीएमपीचे खाते प्रमुख आणि ट्रान्सलिंक इंडिया कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यात ट्रान्सलिंक इंडिया कंपनीच्या प्रतिनिधींनी ही सेवा देणे परवडत नाही असे सांगितले. यावर बकोरिया यांनी परवडत नसेल तर करार रद्द करा आणि पीएमपी मार्फत बस संचलनात आणाव्यात अशाप्रकारचे  आदेश अधिकाऱ्यांना दिले.

 

बकोरिया यांनी कारभार हाती घेतल्यानंतर पीएमपीची संचलन तुट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच पीएमपीच्या मालकीच्या बसेस वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

याबद्दल पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया म्हणाले,”पीएमपीच्या स्वमालकीच्या बस दिवसेंदिवस कमी होत आहेत. भविष्यात ठेकेदारांनी संप केला तर संपूर्ण पुण्याला वेठीस धरले जावू शकते. त्यामुळे स्वमालकीच्या बस ठेकेदारांना देण्याऐवजी पीएमपी स्वतः चालवणार आहे. बस ठेकेदारांना चालवायला देण्याऐवजी आम्ही स्वत: चालवू शकतो आणि आम्ही सक्षम आहोत असा विश्‍वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.