पुणे, दि. 14 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): फिर्यादी तरुणीने ऑनलाईन वाईन खरेदी
करण्यासाठी गुगलवर सर्च केले. त्यावेळी त्यांना 9337749702 या
क्रमांकाची माहिती मिळाली. तरुणीने या क्रमांकावर फोन केला असता समोरच्या
व्यक्तीने पेमेंटच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर फिर्यादी यांना यूपीआय ट्रांजेक्शनची
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट (accept) करण्यास सांगितले आणि त्यांच्या बँक खात्यातून 96 हजार 902 रुपये
परस्पर दुसरीकडे ट्रान्स्फर केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलीस
ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
हा प्रकार शनिवारी (दि.10 डिसेंबर २०२२) रात्री आठ ते दहा या दरम्यान येरवडा परिसरातील कल्याणी नगर येथे घडला आहे.
गुगलवर सर्च करुन ऑनलाईन वाईन मागवणे या तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी तरुणीच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन तिची 96 हजार 902 रुपयांची फसवणूक केली. याबाबत 25 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.12 डिसेंबर २०२२) फिर्याद दिली आहे.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 9337749702 मोबाईल धारक,
यूपीआय आयडीचा धारक 8770892172 आणि पीएनबी
एचडीएफसी एयु स्मॉलबँकच्या अकाउंट धारकावर आयपीसी 419, 420, 34, आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84