पुणे, दि. 22 डिसेंबर
२०२२ (चेकमेट टाईम्स): भोर तालुक्यातील म्हाकोशी, वागजवाडी आणि सांगवी हि.मा. या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची चर्चा
तालुक्यात सुरु झाली. कारण, म्हाकोशी येथे सदस्यपदाच्या
उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त
मते मिळाली, तर वागजवाडी व सांगवी हि.मा. येथे दोन
उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर विजयी उमेदवार ठरविण्यात आला. याशिवाय
वागजवाडीचे सरपंच हे केवळ एका मताने विजयी झाले.
म्हाकोशी येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये
सदस्यपदाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात संगीता सोपान तुपे
यांना १२३ मते मिळाली. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
त्याखालोखाल नोटा क्रमांक १ ला २८ आणि नोटा
क्रमांक २ ला १०४ मते पडली. तर, दुसरे उमेदवार रेखा
विजय साळेकर यांना ४३ आणि तिसऱ्या उमेदवार कविता राजेंद्र शेडगे यांना ४२ मते
मिळाली. त्यामुळे तालुका निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन पाटील यांनी निवडणूक
निरीक्षक राजेंद्र कचरे व राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ४३ मते
मिळविणाऱ्या रेखा साळेकर यांना विजयी घोषित केले.
वागजवाडीमध्ये निकीता आवाळे या केवळ एका मताने विजयी
झाल्या. येथे प्रभाग क्रमांक २ मध्ये संतोष राऊत व अजित राऊत यांना समान मते
मिळाली. त्यामुळे चिठ्ठीवर संतोष राऊत विजयी झाले.
तर, सांगवी-हि.मा.मध्ये
महेंद्र रवळेकर व कौशल बांदल यांना समान मते मिळाली. यामध्ये कौशल हे चिठ्ठीवर
विजयी झाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84