Type Here to Get Search Results !

तय्यबिया अनाथ आश्रमात मध्यरात्री आगीची दुर्घटना; शंभर मुले बचावली

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या एका अनाथ आश्रमाला दिनांक २६ डिसेंबर 2022 ला मध्यरात्री आग लागली होती.

 

यामध्ये इमारतीत सुमारे १०० लहान मुलं अडकून पडली होती. या सर्वांना अग्निशमन दलानं सुखरुप सुटका केली आहे. ही मुलं ६ ते १६ वयोगटातील आहेत. त्यानंतर दहा मिनिटांत ही आग नियंत्रणात आली. तसेच मुलांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे.

 

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार,"काल मध्यरात्री कॅम्पमधील मुलांच्या तय्यबिया अनाथ आश्रमात रात्री १२.४० वाजता आग लागल्याची माहिती नियंत्रण कक्षात मिळाली. त्यानंतर मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन आणि देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन ही घटनास्थळी रवाना करण्यात आले."

 

घटनास्थळी पोहोचताच आश्रमच्या चार मजली असणाऱ्या इमारतीत तळमजल्यावर आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. यानंतर या तळमजल्यावर अडकून पडलेल्या सुमारे १०० मुलांना आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवण्यात आलं. प्राथमिक अंदाजानुसार, आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळं लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीत इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचं आणि इतर काही साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.