पुणे, दि. 21 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असताना
पिंपरी चिंचवड परिसरातून अशीच एक घटना समोर आली आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर
केल्यामुळे यातील बहुतांश अपघात घडत असतात.
पिंपळे गुरव
परिसरातील रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरातून शैलेश जगताप (वय- २९) हे काटे पुरम
चौकाकडे जात होते. दुचाकीवरून जात असताना शैलेश हे मोबाईलवर बोलत होते. परिणामी
रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधकाचा अंदाज त्यांना आला नाही आणि ते थेट जवळून जाणाऱ्या
स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली पडले. बसच्या चाकाखाली चिरडले गेल्याने शैलेश जगताप
यांचा जागीच मृत्यू झाला.
हा पहा व्हिडिओ :- https://twitter.com/checkmate_times/status/1605449605931753479
पिंपरी चिंचवडमधील
पिंपळे गुरव भागात दुचाकीस्वाराला फोनवर बोलणं जीवावर बेतलं आहे. शैलेश यांनी
गाडीवर असताना हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. शैलेश जगताप
यांच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तसंच मोबाईल
बोलणं टाळावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84