Type Here to Get Search Results !

जबरी चोरी करणारे खोटे पोलीस गजाआड; शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

 

पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पोलीस असल्याची बतावणी करून दोन जण लूटमार करत होते. त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी दोन तासांत अटक केली. ही घटना 18 डिसेंबरला रात्री घडली. रक्षाराम बचराज वर्मा यांनी तक्रार दिली आहे.

 

श्रीकांत भरत कदम (वय 32, रा. पांडवनगर) आणि सुरज राजू धोत्रे (वय 32, रा. जुनी वडारवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

 

जबरी चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे पथकासह आरोपींचा शोध घेत होते. गुन्ह्यातील आरोपी वडारवाडी परिसरात थांबल्याची माहिती सहायक फौजदार अविनाश भिवरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोबाईलसह 65 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

 

चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक विक्रम गोड, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांच्या पथकाने कारवाई केली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.