पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
रिक्षा चालकांच्या विरोधामुळे मागच्या काही
दिवसांपासून बाइक टॅक्सी ॲप चालवणारी कंपनी 'रॅपीडो' चर्चेत होती. या कंपनीविरोधात
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी दुचाकी वाहनांचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर
करण्यास चिथावणी देऊन, दुचाकी चालकांकडून बेकायदेशीर प्रवासी
वाहतुक करुन घेणे, तसेच त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यामधून
शासनाला कोणताही कर न भरता शासनाचीही फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारतीय दंडात्मक कलम
४२०, ५०५,
११४ अन्वये प्रमाणे कलमवाढ करुन रॅपीडो कंपनी व रॅपीडो कंपनीच्या
दोन अधिकाऱ्यांचा आरोपी म्हणून यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी
बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करून घेऊन त्याच्या मोबदल्यामध्ये रॅपीडो कंपनी
आर्थिक फायदा करुन घेत असल्याने रॅपीडो कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील व अन्य
अधिकारी यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला
होता.
यामध्ये रॅपीडो कंपनी व रॅपीडो कंपनीचे अधिकारी अरविंद सांका
आणि शांतनु शर्मा यांचाही सहभाग असल्याने यांच्या नावाचाही समावेश करण्यात आलेला
आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84