पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्हांतर्गत
बदल्यांमध्ये सूट मिळावी किंवा आपल्या सोईनुसार हव्या त्या शाळेवर नियुक्ती मिळावी, यासाठी
किती शिक्षकांनी बोगस शस्त्रक्रिया आणि अंतराबाबतचे बोगस दाखला आणि दिव्यांग
प्रमाणपत्र सादर केले, याची गाव आणि शाळानिहाय माहिती
देण्याची मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुणे
जिल्हा परिषदेकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या
सध्याच्या चालू बदली प्रक्रियेत किती शिक्षकांनी शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
सादर केले आहे. यापैकी किती जणांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्जित रजा घेतलेल्या
नाहीत आणि किती जणांनी अंतर आणि दिव्यांगांबाबतचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे, आदी
मुद्यांबाबतची गाव व शाळानिहाय माहिती देण्याची मागणी बंब यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील काही
शिक्षकांनी चार संवर्गापैकी पहिल्या दोन संवर्गात बदलीतून सूट मिळण्यासाठी कोणी
बोगस घटस्फोट, कोणी बोगस शस्त्रक्रिया तर कोणी अंतराचा बोगस दाखला सादर केला याबाबत
जिल्हा परिषद प्रशासनाकडे खुद्द शिक्षकांनीच तक्रारी केल्या होत्या.
या बातमीची गंभीर दखल घेत या
मागणीसाठी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना १० डिसेंबर २०२२ ला पत्र
पाठवले आहे. बंब यांच्या या पत्राने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. यापैकी कोणताही एका प्रकारात येत
असलेल्या शिक्षकांना एकतर त्यांच्या इच्छेनुसार सोईची शाळा मिळते किंवा बदलीतून
सूटही मिळविता येते. याचा फायदा घेण्यासाठी काही शिक्षकांनी जाणीवपूर्वक ही बोगस
प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप शिक्षकांनीच केला आहे.
या बदल्यांमध्ये
संवर्ग एकमध्ये दिव्यांग, पक्षघाताने आजारी, हृद्य
शस्त्रक्रिया झालेले, यकृत प्रत्यारोपण, कर्करोगाने ग्रस्त, मेंदूचा आजार किंवा
शस्त्रक्रिया झालेले आजी-माजी सैनिकांचे पाल्य, विधवा,
अविवाहित शिक्षिका, घटस्फोटित, परित्यक्ता आदी श्रेणीतील शिक्षकांचा तर, संवर्ग
दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाच्या मुद्यांचा समावेश आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84