Type Here to Get Search Results !

खडकवासला पर्यटनस्थळाचा प्रस्ताव बारगळला; २८ एकर मध्ये बीओटी तत्वावर होणार गार्डन?

 


पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):  खडकवासला धरण, सिंहगड किल्ला ही स्थळे पर्यटकांसाठी कायमच आकर्षण ठरली आहेत. या पर्यटकांना आणखी चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी खडकवासला धरणानजिक जागा उपलब्ध आहे. या जागेत अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.

 

जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने खडकवासला धरणाजवळ असलेल्या 28 एकर मोकळ्या जागेत पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव होता. त्यादृष्टीने या प्रकल्पासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या.

 

परंतु पात्र निविदाधारकांकडून पर्यटनस्थळ विकसित केल्यानंतर जलसंपदा विभागाला देण्यात येणारी रक्कम आणि या जागेची किंमत याचा मेळ बसत नसल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. तरीदेखील जलसंपदा विभागाने याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला असून, शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

त्यामुळे या जागेचा उत्पन्न मिळण्यासाठी खडकवासला धरणानजिकच्या 28 एकर जागेत बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव होता.

 

याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, “खडकवासला धरणानजिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्याकरिता पाच निविदा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. छाणनीनंतर तीन निविदा पात्र ठरल्या होत्या. त्या मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्या होत्या.”

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.