Type Here to Get Search Results !

पुणे पोलिसांनी मुंबई मध्ये घुसून बनावट कॉल सेंटर केले उध्वस्त; कोट्यावधींची होत होती उलाढाल

 


पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईतील बनावट कॉल सेंटर उध्वस्त केलं आहे. कॉल सेंटरमधून फेक कॉल द्वारे लोकांना लुटलं जात होतं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल आणि फसवणूक करण्यात येत होती. मुंबईतील मुलुंडमध्ये हे कॉल सेंटर होतं. येथे ४३ जण काम करत होते.

 

बिनव्याजी रक्कम देतो म्हणून कॉल सेंटरमधून लोणची ऑफर दिली जात होती. तसेच बजाज फिन्सर कंपनीच्या नावाने ही लूट सुरू होती. "नमस्ते, मी बजाज फिनसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिकेटीव्ह बोलत आहे, असं येथील कर्मचारी नागरिकांना बोलत होते.

 

आरोपी हे महाराष्ट्रातील विविध शहरातील नागरिकांना फोन कॉल द्वारे बजाज इन्श्युरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करायचे. बजाज फिनसर्व्हची ५० लाख रुपयांची पॉलीसी काढल्यानंतर झिरो टक्के व्याज दराने पन्नास लाख रुपयांचे लोन मंजुर करुन देतो, असे सांगून नागरीकांकडुन त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो या गोष्टी व्हॉटसअॅपवरुन घेवुन लोनचे सहा महिन्यांचे प्रिमीयम २,५०,०००/- रुपये होत असल्याचे सांगत त्या पैकी १,२५,००० रुपये लोन प्रिमियम म्हणून भरण्यास भाग पाडले जायचे. त्यानंतर नागरिकांची आर्थिक फसवणूक व्हायची.

 

पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईत चाळीस मोबाईल, सात हार्ड डिस्क व इतर साहित्य दत्तवाडी पोलिसांनी जप्त केलं. लोन देतो म्हणून अडीच लाखांची फसवणूक झाली होती.


भारतीय दंडात्मक कलम ४१९, ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना या कॉल सेंटरमध्ये एकुण ४३ मुले-मुली वेगवेगळ्या ठिकाणी बसून फोन कॉल करताना दिसून आले होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.