Type Here to Get Search Results !

मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही: राज ठाकरे

 

पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): मुंबई, पुणे या महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याबाबत मोठं विधान केलं आहे. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पण पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते. 

 

राज ठाकरे म्हणाले,"सन १९९५ च्या आगोदरचा महाराष्ट्र आणि नंतरचा महाराष्ट्र यावर लेख लिहावासा वाटतो. ९५ पूर्वी महाराष्ट्रात काही नव्हतं शांतता होती. पुण्यातील लोकांनी हे काढून पहावं. एका पुण्याचं आता चार-चार पुण्यात रुपांतर झालंय. मी पूर्वी पुण्याला यायचो तेव्हा आमचे मित्र म्हणायचे नदी पलिकडचं पुणं ना. एवढीच त्यावेळी पुण्याची परिभाषा होती. पण आता हिंजवडी काय, मगरपट्टा काय! कुठल्या कुठे पसरलंय पुणं. मी अनेकदा माझ्या भाषणांमधून सांगत आलोय की मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला पुणं बरबाद व्हायला वेळ नाही लागणार."

 

बदलाच्या वेगात आपण असं शिरलो की त्याला बरोबर घेऊन पुढे आलो. त्या वेगानं आपल्याला आजवर पुढे आणलं आहे. त्या वेगामुळं चित्रपट बदलले, नाटक, साहित्य, राजकारण बदललं. बदल हा गरजेचा असतो हे मान्य आहे पण तो आपल्या जीवावर उठणार असेल तर त्याचं काय करायचं, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

 

महाराष्ट्रातील बदलावर भाष्य करताना ते म्हणाले,”95 नंतर सगळं बदलत गेलं. कारण यापूर्वी सगळ्या चळवळी, सर्व राजकीय पक्ष हे सगळं उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात होतं. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तो दुआ होता. ९५ नंतर यांची मुलं परदेशात जायला लागली त्यानंतर ते राजकारणापासून बाजूला झाले. त्या राजकारणाला खूप मोठा वर्ग ज्याची राजकारणाला गरज आहे तो राजकारणाला तुच्छ मानायला लागला. हा बदलही आपल्या जीवावर उठत आहे.”

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.