पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी
समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन मध्ये चेन
ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. याबरोबरच पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक
कोंडीचा विळखा असल्यामुळे, नागरिकांना स्टेशनवर पोहचायला उशीर होत
असल्याने काही नागरिक जाणून बुजून ट्रेन सुरु झाली की चेन ओढतात. या गोष्टीचे
गांभीर्य व्यवस्थापनाकडून घेण्यात आले असून, नागरिकांनी
स्टेशनवर १ तास यावे जेणेकरून हे प्रकार कमी होतील, असे
आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.
विशेषतः पुण्यातून सायंकाळी बाहेर गावी जाणाऱ्या ट्रेनची संख्या
मोठी आहे. गोरखपुर, इंदोर, कोलकाता,
जम्मू यासारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून संध्याकाळी
प्रस्थान करतात. पुणे शहरात गेल्या दिवसांपासून संध्याकाळी वाहतूक कोंडी देखील होत
आहे यामुळे काही प्रवासी यांची ट्रेन निघून जाते या पार्श्वभूमीवर हे अवाहन करण्यात आले आहे.
म्हणून विमानाप्रमाणेच आता
प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर देखील १ तास आधी पोहचावे असे सांगण्यात येत आहे.
प्रवाशांनी नियोजित ट्रेन सुटण्याचा आधी रेल्वे स्टेशनवर १ तास पोहचा, असा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84