पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध विद्यार्थांना परदेशी
शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची संख्या अत्यंत कमी असल्याने, शिष्यवृत्ती संख्येत वाढ करावी अशी
मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे
केली. या संख्येत वाढ करण्याचे आश्वासन देत याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे
मुख्यमंत्र्यांनी माने यांना सांगितले.
विधीमंडळाच्या हिवाळी
अधिवेशनादरम्यान त्यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट
घेऊन त्यांना निवेदन दिले. माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार कडून
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती
देण्यात येते. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना यांच्या सरकारच्या
काळात परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ वरून ७५ करण्यात आली.
मागील वर्षी महाविकास
आघाडी सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती
संख्या वाढवून २०० करण्याची तसेच उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचे अश्वासन दिले
होते. मात्र सन २०२२ – २३ च्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत विद्यार्थ्याची संख्या तसेच उत्पन्न
मर्यादा ही जशी होती तशीच ठेवण्यात आली आहे.
मार्च २०२१ मध्ये
समता प्रतिष्ठान मधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याची
घोषणा महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत केली होती. मात्र याबाबत कार्यवाही
करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे बार्टी मधील अनागोंदी कारभार, शिष्यवृत्ती भ्रष्टाचार याची सरकारने चौकशी करावी भ्रष्टाचाराचे आरोप
असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपण या
विषयात लक्ष घालून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा अशी विनंती
त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत यासबंधी लवकरच
निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84