पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): द अकॅडमी स्कूल (TAS), पुणे च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यशाळेत प्रामुख्याने STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. स्टेम शिक्षण हे आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन विकसित करण्यास मदत करणारी पद्धती असून याद्वारे विद्यार्थ्यांमधील अभ्यासातील समस्या दूर करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता वाढते.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांनी त्यांच्या इतर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तसेच शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मिळून आयोजित केली गेली होती. द अकॅडमी स्कूल म्हणजेच 'टीएएस'च्या 7 इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचे शिवधनुष्य पेलले होते. सर्जनशील विचार आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यशाळेची संकल्पना मांडणे, तिची आखणी करणे आणि कार्यशाळा प्रत्यक्षात आयोजित करणे हे काम या शाळेच्या विद्यार्थ्यांनीच पार पाडले होते.
विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये तंत्रज्ञानाचा पहिला अविष्कार कोणता होता, तंत्रज्ञानाची सुरुवात कधी झाली, सार्वकालिक सर्वोत्कृष्ट शोध, तंत्रज्ञानाचे भविष्य, वैज्ञानिक स्वभाव, रासायनिक अभियांत्रिकी आणि इतर अनेक गोष्टी या कार्यशाळेत दाखवण्यात आल्या. या कार्यशाळेचे आयोजन द अकॅडमी स्कूलच्या आवारात करण्यात आले होते.
“आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होतो आणि आमचे शिक्षक आम्हाला जशा गोष्टी समजावून सांगतात तशा त्या आम्हालाही इतरांना समजावून सांगता येतात का, हे देखील आम्हाला पाहायचे होते. गोष्टी समजावून सांगण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. यातून आम्हाला कळालं की शिकवण्यातून आम्हाला आणखी गोष्टी शिकता आल्या”,असे या कार्यशाळेच्या आयोजनाचा एक भाग असलेल्या इयत्ता 7 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले.
“ही कार्यशाळा हे संपूर्णत: विद्यार्थ्यांचे यश आहे. विद्यार्थी जे शिकतात त्याती अंमलबजावणी कशी करता येईल, विद्यार्थी नव्या कल्पनांसह पुढे कसे येतील, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोण कसा विकसित होईल यावरच आम्ही सातत्याने लक्ष्य केंद्रीत करत असतो आणि ही कार्यशाळा त्याचे फलित म्हणता येऊ शकेल,” असे द अकॅडमी स्कूलच्या सीईओ डॉ. मैथिली तांबे यांनी म्हटले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84