पुणे, दि. 14 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): ‘दर दिवसाला जगात अनेक बदल होत आहेत, त्या अनुषंगाने सध्या सरकारही दर शंभर दिवसाचे नियोजन करून त्याप्रमाणे आढावा घेत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील या बदलत्या जगाचा आढावा घेत समाजाच्या प्रश्नांवर उत्तरे शोधणारे संशोधन करावे,’ असे सेंटर फॉर मटेरिअल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीचे (सीमेट) महासंचालक डॉ. भरत काळे यांनी सुचविले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेची विद्यापीठ पातळीवरील फेरी मंगळवारी झाली. ही स्पर्धा सुरवातीला महाविद्यालय पातळीवर घेण्यात आली. यात चार हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते आणि त्यातून विभागीय स्तरावर स्पर्धा झाली असून त्यातून २३३ प्रकल्प निवडण्यात आले. आता विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा होत असून त्यातून ४८ प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन वामन यांनी केले. तर प्रा. रवींद्र जायभये यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता व सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजित कार्यक्रमात डॉ. काळे बोलत होते. डॉ. काळे म्हणाले, ‘अनेक मोठे प्रश्न सध्या भेडसावत आहेत. ई-कचरा, पडीक जमीन सुपीक करणे, शेती व तंत्रज्ञान यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन हे केवळ भर घालणारे नाही तर नव्याने काही गोष्टी निर्माण करणारे असावे.’
डॉ. सोनवणे म्हणाले, ‘आपल्या अवतीभोवतीचे जग समजून घेत प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला की त्यातूनच नव्या कल्पना शोधता येतात. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान नाही तर मानवता हे देखील संशोधनाचे खूप मोठे क्षेत्र आहे.’ यावेळी प्रा. काकासाहेब मोहिते यांनी ‘आविष्कार’ स्पर्धेची माहिती दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84